Thursday, 21 April 2016

MAD-रास ६

चेन्नईमध्ये आल्यानंतर मी उत्साहानं लर्न तमिळ इन थर्टी डेजवगैरे पुस्तकं आणली. अत्यंत भिकार छपाई असलेल्या या पुस्तकांची दोन पानं वाचणं म्हणजे डोकेदुखीला आमंत्रण. त्यापेक्षा आपली नजर आणि कान उघडे ठेवून शहरामध्ये वावरायला सुरूवात केल्यावर सुरूवातीला काही अक्षरांची लांबलचक ट्रेन वाटणारी भाषा आता वेगवेगळ्या शब्दांद्वारे समजत गेली. भाषेचा हा तिळा उघड मंत्र मिळाल्यावर मद्रास चक्क आपलं वाटायला लागलं. दरम्यान कुणीतरी मला मराठी इंग्लिश तमिळ डिक्शनरी पीडीएफ दिली. सुमारे १९७४ मध्ये कै. सौ. रमाबाई जोशी यांनी लिहिलेला हा शब्दकोष खूप सुटसुटीत आणि समजायला सोपा आहे. तमिळ उच्चार देवनागरीमधून लिहून मग मराठी अर्थ सांगितलेला असल्याने कुठल्याही मराठी व्यक्तीला पटकन वाचता येऊ शकतो. मद्रासप्रांती सुमारे पन्नास वर्षांपूर्वी आलेल्या कुण्या गृहिणीनेच लिहिलेला हा शब्दकोष. रोजच्या व्यवहारामधले नेमके शब्द सांगणार्‍या या कोषाबद्दल मलातरी फार कौतुक आहे. ज्या काळी हाताशी गूगल नव्हते, इंटरनेट नव्हते, मद्रासामधला सर्वसाधारण काळच हिंदीविरोधाचा होता. तश्यावेळी एका साध्याशा स्त्रीने आपल्यासारख्या लोकांना इकडे आल्यावर त्रास होऊ नये म्हणून रचलेला हा शब्दकोष व्यावहारिकदृष्ट्या आजही खूप उपयोगी आहे. शिवाय त्यात मराठी आणि तमिळ दोन्ही भाषांमधल्या समानार्थी म्हणींचा फार मोठा संग्रह आहे. त्याखेरीज रोजच्या व्यवहारामध्ये वापरता येण्याजोगी वाक्ये, दिशा, वार, महिने, अंकमोजणी, विभक्ती यासारख्या अनेक छोट्या छॊट्या पण निकडच्या शब्दप्रयोगांची माहिती यात दिलेली आहे. मला अडचणीच्या वेळी जिथे गूगलने हात टेकलेत तेव्हा या शब्दकोषाने मदत केली आहे. त्यासाठी मी रमाबाई  जोशी आज्जींची कायम आभारी राहीन. पन्नास वर्षांपूर्वी इतका मोठा शब्दकोष एकहाती करणं हे फार सोपे काम खचितच नाही.

आपल्याला (म्हणजे देवनागरी लिहिता-वाचता येणार्‍यांना) डोळ्यांना आणि डोक्याला थोडाफार ताण देऊन का होईना, गुजराती वाचता येते. थोडेसे अजून प्रयत्न केल्यास बंगाली अक्षरंही समजतात. पंजाबीसुद्धा वाचता येईल. पण कधी तमिळ अक्षरं समजतात? अजिबात समजत नाहीत. मला आधी थोडीफार कानडी अक्षरं वाचता येत होती, पण तरीही तमिळमध्ये ओ की ठो काही कळायचं नाही. कारण, त्यांची लिपी पूर्ण वेगळी आहे. आता यावर भाषातज्ञ बरंच काही सांगू शकतील पण मी काही भाषातज्ञ नाही. एकंदरीत वाचनावरून असं लक्षात आलंय की भारतात भाषांचे दोन गट आहेत. संस्कृत आणि द्राविडी. द्रावीडीमध्ये तमिळ, मल्याळम, तेलुगु आणि कानडी या भाषा येतात. पैकी कानडी आणि तेलुगु मराठी भाषेसोबत बराच रोटीबेटी व्यवहार करून आहे. पण तमिळ -मल्याळम या मात्र वरकरणी फार वेगळ्या भाषा वाटतात. तमिळ बोलण्यासाठी मला जितके प्रयत्न करावे लागले नाहीत त्याहून अधिक प्रयत्न मला लिहिण्यावाचण्यासाठी करावे लागत आहेत. खरंतर इथली पहिली दोन वर्षं मला एकदम निरक्षर झाल्यासारखंच वाटायला लागलं. काहीच वाचता यायचं नाही. आता हळूहळू सरावानं काही अक्षरं वाचता येतात.


तमिळ भाषिकांनी लिहिलेली रोमन लिपी हा अजून एक वेगळाच विषय आहे. तमिळनाडूच काय पण एकंदरीत दक्षिणेकडे बर्‍याचदा अजून एक मजा दिसून येते. माझं नाव इकडे लिहिताना सर्रास “Nandhini” असं लिहिलं जायचं. कितीतरीवेळा मग ते नंधीनी नाहीये, नंदिनी आहेअसं सांगावं लागायचंतरी कित्येकदा समोरच्यावर परिणाम व्हायचा नाही. मग लेकीच्या शाळेमध्ये तमिळ मुळाक्षरं चालू झाली तेव्हा या घोटाळ्याचा नक्की काय तो शोध लागला. तमिळ मध्ये महाप्राण व्यंजने नाहीच. म्हणजे ध, , , ठ ही  व्यंजने त्यांच्या बाराखडीत नाहीतच. क, , , घ या चारही व्यंजनासाठी एकच   हे अक्षर वापरले जाते. त्यानंतरची तीन व्यंजने ख ग घ नाहीत पण ङ मात्र आहे. तसंच च नंतर येणारं अक्षर ञ आहे. असंच त, , ट ण, म या अक्षरांचं आहे.
ही तमिळ व्यंजने.

                  न (न चे अजून एक अक्षर आहे!!)
             ळ्ळ (यावर सविस्तर लिहिले आहे)  
 ळ   र्र  .
 वडामोळि एळुतकळ म्हणजेच ग्रंथाक्षरे किंवा उत्तर भारतीयांची अक्षरेही अक्षरे फारशी वापरली जात नाहीत.
    ,   ,  ,    க்ஷ क्ष ஸ்ரீ श्री

  
तमिळमध्ये स्वरांसाठी चौदा अक्षरं आहेत. अं आणि अ: नाही, पण दीर्घ ए आणि दीर्घ ओ आहे. बहुतेक तमिळ अक्षरांचे उच्चार हे ने होत नाहीत तर आ, , इ नए वगैरे होतात. शब्दाच्या शेवटी आ‍ऽजोडल्यास तो प्रश्नार्थक बनतो. उदा: साप्पडु म्हणजे जेवण. साप्पिडु म्हणजे खा आणि साप्प्टीयाऽऽ म्हणजे जेवलास का?
, , , झ साठी तमिळमध्ये केवळ च वापरला जातो. साठी सुद्धा वापरला जातो. मग मटण सुक्काचा तमिळ उच्चार चुक्काअसा केला जातो. चावीचा उच्चार इकडे सावीहोतो.  ज हे ग्रंथाक्षर म्हणून त्याचे वेगळे व्यंजन जरी तमिळने स्विकारलेले असले तरी मुख्य भर वरच असतो. तीच गत ची. त्याला प फ ब भ ही चारही अक्षरं दर्शवावी लागतात. आता यामध्ये कशाचा उच्चार कशाने करायचा हे वाचून वाचून (च) समजू शकेल. लिहिताना பம்பாய் (पंपाय) लिहायचं आणि वाचताना ते रोमन शहर नसून बंबायम्हणजेच मुंबई आहे असं समजायचं याला फार प्रदीर्घ साधना करावी लागणार. माझी तितकी साधना अद्याप झालेली नाही त्यामुळे ही अंकलिपी आता जरा बाजूला ठेवते आणि मजेमजेच्या गोष्टींकडे येते. या लिमिटेड व्यंजनांमुळे तमिळ भाषेमध्ये जेव्हा इतर भाषिक शब्द येतात (खासकरून इंग्रजी आणि संस्कृत) तेव्हा त्यांचं सगळं रूपडंच बदलतं.


विनायक म्हणजेच गणपती तमिळमध्ये विनायगार बनतो. पुरणपोळी हा शब्द इकडे सर्रासरीत्या बुरणबोळी असा म्हटला जातो. ह फारसा नसल्याने होळीचा सणसुद्धा इकडे बोळी म्हणूनच ओळखला जातो. म्हणजे आपल्याकडे पुरणपोळी आणि होळी यांचे अतूट नाते आहे, इकडे तर त्यांचे पार अद्वैतच झाले आहे.  मागे एका फ़ेसबूक ग्रूपवर एक बाई मराठी पद्धतीची पर्फी (PURFI)  केली असं सांगत होत्या. मला काही केल्या या बाईंनी नक्की काय पदार्थ केला ते समजेना. म्हणून त्यांना रेसिपी विचारली तेव्हा उजेड पडला की बाईंनी बेसनाची बर्फीकेली होती. पुरीला बुरीदेखील सर्रास म्हणतात. डायेटवाल्यांनी हे लक्षात ठेवायला हरकत नाही.तमिळमधे न साठी दोन वेगवेगळी अक्षरे आहेत. पैकी  हे अक्षर केवळ शब्दाच्या सुरूवातीला “न” असेल तरच वापरले जाईल. इतरवेळी  हे अक्षर वापरले जाते.  म्हनजे ”. अनुस्वार देताना त्या त्या वर्णमालेमधले अनुनासिक अक्षरेच लिहिली जातात. उदा. नंदिनी लिहिताना : நந்தினி असं लिहिलं जाईल. इथे न सुरूवातीचा असल्याने  वापरला गेलाय मग अनुनासिक स्वरासाठी अपूर्ण न ந்  (इथे त्यासाठी डोक्यावर टिंब देतात) मग नेहमीचा न आणि त्याला वेलांटी. னி ही वेलांटी नीट पाहिलीत तर लक्षात येईल की आपल्या दीर्घ वेलांटीसारखीच आहे. पण ही तमिळमधली र्‍हस्व वेलांटी आहे.आता आपली नावे रोमन लिपीमध्ये लिहिताना तमिळ लोकं वेगळीच पद्धत वापरतात. त्यांना नंदिनी लिहायचे झाले तर NANDINI असे लिहिले की ते नंडीनी वाचतात. म्हणून मग लिहितीना NANDHINI लिहितात म्हणजे मग ते नंदिनी झाले. आता थ आणि ध हा मुळातच या भाषेत नसल्याने त्यांचे घोळ होत नाहीत. पण आपल्याला मात्र पावलोपावली धक्के खात रहावं लागतंय. माझ्या लेकीचं नाव मी अतिशय सुटसुटीत सुनिधीठेवलं, पण हाय रे कर्मा. इथे तमिळनाडूमध्ये तिला हाक मारताना सुनितीअशीच हाक मारली जाते. क्वचित स्पेलिंग लिहितानासुद्धा SUNITHEE लिहीतात. मग ते खोडून मला परत T नाय ओ D असं चारचारदा सांगावं लागतं. शेजारणीने लेकीचं नाव दिशीका ठेवलं. हाक मारताना तीशिखा. तिला त आणि द मधला फरक समजवून सांगेपर्यंत माझी जीभ पोंपलली.


मध्यंतरी एका तमिळ लेखिकेचे मराठीमध्ये अनुवाद केलेलं पुस्तक वाचत होते. वाचताना कित्येक शब्दांना चांगल्याच ठेचा लागत होत्या पण कुझांबु शब्दाने तर हैराण केलं. अनुवादकाने तमिळ कादंबरीचा अनुवाद इंग्रजीवरून केल्यामुळे इंग्रजीमधले काही शब्द जसेच्या तसे उचलले होते. Kuzhambu असं स्पेलिंग असलेल्या या शब्दाचा उच्चार आहे- कोळंबु. कोळंबु म्हनजे रस्सा असलेली भाजी अथवा कालवण. तमिळमध्ये ळ चे दोन वेगळे उच्चार आहेत, त्यांसाठी दोन स्वतंत्र अक्षरंही आहेत. यापैकी  त्यातल्या एका  ” (जीभेला अधिकाधिक मागे नेऊन टाळूला लावून ळ म्हणायचा प्रयत्न करा) रोमन लिपीमध्ये ट्रान्स्लिटरेट करताना ZH असे वापरले जाते. यामागे नक्की काय भाषाशास्त्रीय कारणे आहेत माहित नाही. पण सर्वसाधारणपणे आपण वाचताना याचे करून वाचतो. पण ते चूक आहे. कणीमोझी नाही, कणीमोळ्ळी. कोझीकोड्डे नाही, कोळ्ळीकोड्डै. हा  तमिळ भाषेमधला सर्वात अनोखा उच्चार मानला जातो. केवल तमिळ आणि मल्याळममध्येच असला उच्चार आहे म्हणे.

तमिळ भाषा व्यंजनांच्या बाबतीत परिपूर्ण नाही. अनेक व्यंजने नसताना ती आपल्या भाषेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आहे तेच योग्य आहे असा पवित्रा घेऊन मुद्दाम चुकीचे उच्चार करण्यामध्ये काही लोकं धन्य मानत असतात.. पण यामुळे कित्येक अशक्य विनोद मात्र घडत असतात. इंटरनेट्वर आर आय पी इंग्लिशवगैरे म्हणून काही इमेजेस आलेल्या पाहिल्या असतील. गोभीहा शब्द तमीळमध्ये कोपीअसा लिहायचा, आणि मग त्याचं परत रोमनीकरण करताना ते गोपीअसं करून मेनूकार्डावर GOPI MANCHURIYAN असं छापायचं. फ़्रॉक्सचं तमिळीकरण वरून रोमनीकरण करताना ते FROGS  केलेलं मी पाहिलं आहे.पण या सर्व उहापोहाचा मला फायदा काय झाला? एक तर जी भाषा आधी कानाला ऐकायला फारच कठीण वाटत होती, त्यामधली व्यंजनं आणि स्वरावली लक्षात आल्यावर तेच शब्द मराठीच्या अथवा कानडीच्या रूपामध्ये वापरले तर कित्येक शब्द समान आहेत हे लक्षात आलं. पळम समजायला किती कठीण पण फळ हा शब्द तमिळमध्ये पळ असाच लिहिला जाईल हे समजलं की पळ= फळं हे बरोबर ध्यानात आलं. मोदगम हे नवीन नाव वाटतं, पण मराठीमध्ये तेच मोदक आहेत. एखादा म्हणजे ओण्णू हे समजल्यावर ओण्णूवेळ्ळे म्हणजे एखादवेळी हे बरोबर समजलं. वेळ हा शब्द मराठीमध्ये आहेच की. मग ओण्णू ओण्णे हे कितीही  विचित्र वाटलं तरी एकुलता एकआहे हे पटकन लक्षात आलं. बारम म्हणजेच भार म्हणजेच ओझे! कानडीमध्ये हुळी म्हणजे आंबट आणि ह चा प केला की तमीळमधला पुळी म्हणजे आंबटच! मग पुळी म्हणजे चिंच हे ओघानं आलंच.  सेम याच नियमाने हू म्हणजे पू म्हणजे फुलं. कानडीमध्ये येली म्हणजे पान, तेच  तमिळमध्ये इलै म्हणजे पान. कलिंगडाचे नाव आहे तरबूसपळम. लांबलचक नाव असलं तरी टरबूज फळ हे दोन कीवर्ड्स ध्यानात घेतले की शब्द लक्षात राहतो. तुणी म्हणजेच मराठीमधला धुणी म्हणजेच कपडे हे लक्षात ठेवायला किती सोपं आहे? पात्रम म्हणजेच भांडी. गच्ची म्हणजे माडी. हे शब्द मराठीमध्येही वापरले जातातच की. आपण औषधाची मात्राघेतो, इकडे औषधालाच मात्रै म्हणतात. आहे की नाही मज्जा!!! घात= अबायम (अपायम) दुपार= मध्यान्नम, कोथंबीर- कोतमल्ली, फटाके = पटास, बयम= भय. असे अनेक वरकरणी कठीण वाटणारे पण समजून घेतल्यावर सोपे वाटणारे शब्द मेंदूच्या डिक्शनरीमध्ये आपोआप भरले गे्ले त्यासाठी फारसे आयास करावे लागले नाहीत..

हा लेख जरा जास्तच कठिण झालाय का? लिहायला सुरूवात केली तेव्हा इतका किचकट होइल असं वाटलं नव्हतं. हरकत नाही, आता हळूहळू माझी तमिळ भाषेबद्दलची भिती गेल्यातच जमा आहे. लेकीच्या शाळेसोबत मी पण अक्षरांची बाराखडी गिरवतेच आहे. पण आता अभ्यास फार करून झालाय. पुढच्या लेखामध्ये मात्र फिरायला कुठंतरी जाऊ या. मस्तपैकी शॉपिंग आणि खादंती करण्यासाठी तर नक्कीच.

No comments:

Post a Comment