Wednesday 20 September 2017

शब्द ३ - जॉइण्ट वेंचर


मी इथं एवढ्या टेन्शनमध्ये बसलेय आणि तुला फालतू जोक्स सुचतात?” मी हातात जे काय होतं ते धरून एशानवर फेकलं. दुर्दैवानं हातात इंग्रजी वर्तमानपत्राची चार पानी ग्लॉसी पुरवणी असल्यानं ती जेमतेम तीन-चार इंच उडाली आणि फडफडून खाली पडली.
काय वाटेल ते बोल, पण माझ्या जोक्सना फालतू बोलायचं नाहीहा उगाचच कॉलर नसलेल्या टीशर्ट्सची कॉलर उंचावत म्हणाला. “कशाला टेन्शन घेतेस? सगळं आरामात होइल
तुझ्याशी लग्न केल्यापासून टेन्शन हे माझं मिडल नेम झालंय. आता प्लीज जरा पाच मिनिटं शांत बैस. मला काहीतरी विचार करू देत
पण एशान शांत बसणार? माझं बोलणं संपायच्या आत त्यानं उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहतेगाणं ओरडायला सुरूवात केली. झक मारली आणि याला माझ्या आवडीची जुनी गाणी ऐकायची सवय लावली. माझापण पेशन्स संपलाच, शेवटी उठून बेडरूममध्ये आले आणि दरवाजा लॉक करून घेतला. बस आता बाहेर वाटेल तेवढ्या आवाजात ओरडत. रात्रीचे अकरा वाजून गेले होते, आज मला झोप येत नव्हती. डोकं हळूहळू दुखायला लागलं होतं. रात्री जेवतानासुद्धा माझं लक्ष नव्हतं. गेली पाच वर्षं मी ज्या कंपनीमध्ये काम करत होते, त्यांनी अचानक कंपनीचं मुख्य ऑफिस लंडनला शिफ्ट करायचा निर्णय घेतला होता, भारतातली सर्व ऑफिसेस बंद करायचा त्यांचा निर्णय मलातरी अचाट वाटला होता. मी मॅनेजमेंटला कितीतरीवेळा समजावलं होतं. ईव्हेंट मॅनेजमेंटसाठी तुम्हाला बेस इथंच ठेवणं चांगलं आहे, वाटलं तर माणसं कमी करा, ऑफिसस्पेस कमी करा पण सगळाच गाशा गुंडाळू नका. पण त्यांनी ऐकलंच नाही. शिवाय भरीसभर मला महिन्यांभरात लंडन ऑफिसला जॉइन व्हायचं पत्र हातावर टेकवलं होतं. डोकंच फिरलं दुपारपासून. कशीबशी तासभर ऑफिसमध्ये बसले, मग राहवेना म्हणून सरळ उठून एशानच्या ऑफिसमध्ये टॅक्सी करून गेले. हा नेमका क्लायंट मीटींगला निघून गेलेला. डबल डोकेदुखी. ऑफिसमधून फोन आल्यावर अजून दोन दिवस येत नाही, तब्बेत ठिक नाही असा निरोप दिला. एशान रात्री साडेनऊला घरी आला. त्याला हे सर्व सांगितल्यावर त्यानं किमान काहीतरी समजून घेऊन सल्ला द्यावा तर म्हणे, “अरेवा! बेस्ट आहे की. मग कधी निघतेस लंडनला?”
असं कोण विचारतं का आपल्या बायकोला?वैताग वैताग आणि वैताग.
थोड्यावेळानं त्यानं बेडरूमचा दरवाजा उघडला. मी सगळे दिवे बंद करून बेडवर नुसती पडली होते.
झोपलीस?” त्यानं दिवा लावत विचारलं. मी नुसतं मान हलवली.
कशाला इतकी चिडचिड करतेस? तुझी अख्खी कंपनी शिफ्ट होतेय तर तुझी ट्रान्स्फ़र होणारच ना.. इतकं टोटली अनएक्स्पेक्टेड तर नव्हतंच?” त्यानं हलकेच माझ्या कपाळावर हात ठेवून विचारलं. “तुला या कंपनीमध्ये संधी चांगली आहे. या अप्रेझलला वरच्या लेव्हलला पोचशील. गेली पाच वर्षं तुझा परफॉर्मन्स कायम बेस्ट राहिलाय. मग काय प्रॉब्लेम आहे?”
मला लंडनला शिफ्ट व्हावं लागेल. एखाद्या इन्व्हेंटसाठी आठपंधरा दिवस नव्हे, कायमचं. तुला सोडून? ते तुला चालेल?”
मला चालेल की नाही त्याचा विचार करून तू तुझे करीअर गोल्स सेट करणार आहेस का? मला तू दूर गेलेली आवडणार नाही, पण तुझी नोकरी, तुझं करीअर, तुझा चॉइस. तुला जायचंच असेल तर माझा पूर्ण सपोर्ट आहे.”
पण मला नाही जायचंय, मी राजिनामा देईन. नवीन नोकरी बघेन माझं तुणतुणं तिथंच अडकलं होतं.
त्यानं माझ्या ओठांवर ओठ ठेवले.  “मग झालं ना. एवढा टेन्शन घ्यायचा मामला आहे का?”
तुला प्रत्येक गोष्टच कशी इतकी क्षुल्लक वाटते रे?” माझे हात त्याच्या गळ्यात टाकत मी विचारलं.
सांगू?” त्यानं हसत विचारलं. “तुझ्याखेरीज जगातली प्रत्येक गोष्ट क्षुल्लक तर आहे.”
दुसर्‍या दिवशी मी ऑफिसमध्ये जाऊन राजिनामा टाकला. माझ्या वरिष्ठांना ही गोष्ट बिल्कुल आवडली नाही, त्यांच्यामते, मी लंडनला  आधी जॉइन व्हायला हवं होतं आणि मग नंतर जसेजसे परत भारतातले प्रोजेक्ट्स मिळतील तसं अधिक वेळ इकडं घालवून इथं परत बदली करून घ्यायला हवी होती. यांच्या चुकलेल्या बिझनेस पॉलिसीपायी मी माझं घर भातुकलीसारखं इकडून तिकडे मांडायचं का? तसा मला इतर काही प्रॉब्लेम नव्हता, आमच्या कंपनीच्या भारतीय क्लायंटचे जगभरामध्ये कुठही इव्हेंट असले की मला जावं लागतच होतं. फिल्म फेस्टीव्हल्स, एवॉर्ड सेरेमनी, सौंदर्यस्पर्धा असल्या कार्यक्रमांसाठी महिनादोन महिना जगभरामध्ये कुठंही जाणं व्हायचंच. पण तेव्हा आपण परत येणार, हे माहित असायचं. वर्षानुवर्षं रहायला माझी तयारी नव्हती. आणि आता एरव्ही एशान कितीही तुझा चॉइस”  म्हणत असला ( तो मनापासून म्हणत असला तरीही) तरी मी बदली घेते म्हटल्यावर अस्सा काही चेहरा पाडून फिरला असता की बास. त्या चेहर्‍याकडं बघून विमान उडायच्या तयारीमध्ये असताना डबल बेल मारून थांबवतेय, कंडक्टर माझ्यावर वैतागलाय तरी मी जोरात धावत एशानकडे परत येतेय आणि तो माझ्याकडं बघून तुझे देखा तो ये जानमअसं गाणं म्हणतोय, असं स्वप्न मला एकदा पडलं. काहीतरीच. मी विमान थांबवून पळते वगैरे प्रत्यक्षात घडेलसुद्धा, पण विमानात कंडक्टर?
एरवीच एशानचं मी महिनाभर वगैरे कामासाठी गेले तरी तुझ्याशिवाय करमत नाहीहे टुमणं चालू राहतं. दिवसातून सतत मेसेजेस, फोन्स आणि मी जिथं कुठं असेन तिथं डीलीव्हर होणारी छान गिफ़्ट्स नाहीतर फुलांचे बुके. माझे कलीग्ज माझ्या नवर्‍याच्या रोमॅन्टिकपणाचं कौतुक करतना थकायच्य नाहीत. एकदातर हा महान नवरा केवळ मला एक दिवस भेटण्यासाठी चार दिवसाचा प्रवास करून आला. मी दोन-तीन वर्षासाठी सलग गेले तर हा लंडन मुंबई विमानाचा मंथली पासच काढेल.
नोकरी सोडायचं मनात नव्हतं पण आता दुसरा काही पर्याय शिल्लक नव्हता. रात्री डिनरसाठी एशानच्या आईवडलांकडे गेलो होतो तेव्हा त्यां दोघांना खूप आश्चर्य वाटलं होतं.  “कशाला राजिनामा द्यायची घाई केलीस? वर्षभर गेली असतीस तरी चाललं अस्तं नामम्मी म्हणाली. “एवढा मस्त चान्स होता
कंचन, ती तुझ्यासारखी नाहीये, तू आणि  डॅड तीस वषांच्या संसारामधेय तीन वर्षं तरी एकत्र राहिला असाल का?” एशान विनाकारण आईला चिडवत म्हणाला.
काय करणार! आमचा संसार आम्ही कसा निभावला हे आम्हालाच माहित. तुझा बाबा रेल्वेचा हापिसर, देशभर बदल्या. त्याही कुठल्या कुठल्या जंक्शनच्या आडगावांमध्ये.. मी कुठं त्यांच्या पाठून फिरणार? त्यात तू लहान. तुझ्या शिक्षणाचं काय? माझं मेडीकल, पीजी वगैरे चालू होतंच. कसे दिवस काढले ते. तुम्हाला दोघांना असला काही त्रास नाही. जग फिरून घे. नंतर आहेच इथं घर आणि नवरा आणि मुलं. आणि हो, एशान राहील तुझ्याशिवाय. पंचवीस वर्षं राहिलाच होता ना लग्नाआधी?”यावर एशान तोंडातल्या तोंडात जे काय बोलला ते फक्त मला ऐकू आलं म्हणून नशीब, कंचननं ऐकलं असतं तर त्याची पूजाच बांधली असती.
कंचन, तसं नाही. मला मुळातच जायचं नाहीयेतसंही मी काही फार करीअरीस्ट वगैरे नाही. स्वत:ला ऊर फोडत विनाकारण मोटेला लावून धावावंसं मला कधी वाटतच नाही. वेळ घालवण्यापुरता, चार पैसे कमावण्याइतका जॉब असला तरी बास.” मी विषय बदलत म्हटलं.
शिवाय, सगळ्यात महत्त्वाचं एशान तिला सोडून आरामात राहील पण तिला करमेल काय? ती एशानला सोडून राहू शकणार नाही, क्यु बेटा सही कहा ना?” इतका वेळ आमचं बोलणं शांतपणे ऐकत बसलेल्या डॅडनी उत्तुंग षटकार ठोकला. दुर्दैवानी ते सत्यदेखील होतं. मी एशानला सोडून इतक्या लांब, इतक्या जास्त काळासाठी राहू शकले नसते हे माझं मलाही माहित होतंच. डॅडच्या या वाक्यावर एशान माझ्याकडं पाहून नुसता हसला.
राजिनामा दिल्यानंतर इतक्या दिवसाची शिल्लक असलेली सगळी सुट्टी आधी वापरायची आणि मग हॅन्डोवरसाठी शेवटचे चार-पाच दिवस ऑफिसमध्ये जायचं असं ठरवलं. त्यामुळं राजिनामा दिल्याच्या दुसर्‍या दिवशीपासून घरी राहून माझी नोकरीशोध मोहिम खटक्यात चालू झाली. खटक्यात म्हणजे शिस्तशीर भांडण वगैरे होऊन. मुद्दा होता, माझा सीव्ही अपडेट करायचा. त्यात मी माझं शिक्षण, अनुभव वगैरे सर्व बैजवार लिहिलं होतं. कॉन्व्हेण्ट एज्युकेटेड नवरा आहे म्हणून कुठल्या महामूर्ख क्षणी यातलं ग्रामर स्पेलिंग एकदा बघम्हणून त्याला ते वाचायला दिलं. रे बाबा!! माझं नाव, जन्मतारीख या दोन गोष्टी सोडल्यास त्यानं प्रत्येक वाक्य बदलून ठेवलं. मला न विचारताच. त्यानं लिहिलेली कॉपी माझ्यापेक्षा जास्त चांगली, मुद्देसूद आणि आटोपशीर होती. पण मला न विचारताच? आमच्या इगोबाई भडकणारच. मग रीतसर युद्ध चालू झाले. एरवी सकाळीसकाळी असं भांडण झालं की, मी ताडताड बॅग उचलून ऑफिसला जायला निघते. संध्याकाळी परत येईपर्यंत दोघांचंही डोकं शांत झालेलं असतं. पण आज मला ऑफिसला जायचं नव्हतं, मग काय दिवसभर फटाकेच फटाके. त्यात परत रोज दुपारी जी बाई स्वयंपाकाला येते तिनं दांडी मारली,मग तू स्वयंपाक करणार की मी यावरून थोडाफार विवाद. शेवटी वैतागून किचनमध्ये गेले, दिसलं ते पातेलं गॅसवर ठेवलं आणि सापडेल ते सामान त्यात घालायलासुरूवात केली. पाचेक मिनिटं एशान हे बघत उभा राहिला.गरम तेलामध्ये बडीशेप टाकून त्यावर गूळ घातलेला बघितला आणि मग मला सरळ दंडाला खेचून किचनमधून आऊट केलं. मी हॉलमध्ये येऊन निवांत पेपर वाचत बसले! अर्ध्यातासानं कसलेतरी पराठे आणि दही वाढलेलं ताट समोर आलं. एकही शब्द न बोलता मी जेवले.
म्हणून तुला लंडनला जायचं नाहीयेशेवटी आमचे महाशय चिडून उद्गारले. “हा असा आयता नोकर तिथं नसेल. सगळी कामं स्वत:ला करावी लागतील, मुख्य म्हणजे स्वत:च शिजवावं लागेल म्हणून जायचं नाही बरोबर ना?”मी काहीच बोलले नाही. उगाच भांडण वाढवण्यात अर्थ नव्हता. मला दुसरी नोकरी मिळेपर्यंत मी रोज दिवसभर घरी असणार आणि अशीच भांडणं होत राहणार.
शेवटी तो सीव्ही वेगवेगळ्या साइट्सवर टाकला, अर्थात एशाननं लिहिलेलाच.  जुन्या काही सहाकार्‍यांना मित्रमैत्रीणींना मेल केला. बोलता बोलता सहज एशानला त्याच्या ओळखीचं कुणी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये असल्यास माझा मेल फॉरवर्ड करायला सांगितलं. ते ऐकल्यावर हिरव्यानिळ्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक रोखून पाहिलं, अर्थ समजला. तुझ्या या कामांत मी मदत करणार नाही. नाही तर नाही. मला नोकरी मिळेलच. तुझ्या मदतीवर काही अडलं नाही.

खूप दिवसांनी मला वेळ होता, आणि एशानकडे जास्त काम नव्हतं म्हणून आम्ही दोघंही पंधरा दिवसांची मोठ्ठी सुट्टी काढून फिरायला गेलो. एशानला कुठंतरी परदेशात जायचं होतं, पण मला अचानक इंटरव्ह्यु कॉल आला तर दोन-तीन दिवसांत परत यायला सोयिस्कर म्हणून गुजरात- राजस्थान कारनं हिंडलो. आम्ही एवढं भटकून परत  येईपर्यंत मला एकही कॉल आला नाही. कुठल्याच एजन्सीमध्ये जागा शिल्लक नव्हती. शिल्लक असली तरी इतक्या सीनीअर पोझिशनवर नवीन जागा भरायला कुणी तयार नव्हतं. माझ्या आधीच्या एजन्सीचं मॅनेजमेंट येडं नव्हतं, या क्षेत्रामध्ये जबरदस्त मंदी चालू होती. लोकांचे प्रोजेक्ट्स महिनोमहिने रेंगाळत होते. वर्षं झाली तरी पेमेंटचा पत्त्ता नव्हता. जसजसा माझा हॅण्डोव्हरचा दिवस जवळ येत चालला तशी चिडचिड अजून वाढत गेली. “परत एकदा तुझ्या बॉसशी बोलून बघ. सहाएक महिने गेलीस लंड्नला तरी आपण मॅनेज करूएशान उगाच मला समजावत म्हणाला.
मला नाही जायचं मी पुन्हा तोच जप केला.
असा हट्ट करून कसं चालेल? फिल्डची अवस्था तुला माहित आहे. नवीन चान्सेस कुठंच् नाहीस. एजन्सीज नवीन फ्रेशर पोरं भरतात आणि त्यांच्याकडून कामं करवून घेतात. असं पाच सात वर्षांचा अनुभव असलेलं घेण्यापेक्षा ते परवडतं
आणि नवीन पोरं क्रीएटीव्हली काम करतात?” मी वैतागून विचारलं.
नाही, काही ब्राईट स्पार्क सोडले तर बाकीचे फक्त गधामजदूरी करतात. कमॉन. एवढेदिवस तुला या क्षेत्रात झालेत, हे माहित नाही असं वागू नकोस, व्हॉट द हेल.. मी माझ्या एजन्सीमध्ये तेच करतोय. मला ते परवडतं. दर दोन वर्षांनी फ्रेशर घ्यायचे...बाकीचं काम जी ऑलरेडी क्रीएटीव्ह टीम आहे ती ओढून नेतेच. फ्रेशर सोडून जातातच, मग नवीन घ्यायचे. सगळ्यांत मेन क्रीएटीव्ह तर मीच करतोय.. ईव्हेंट्समध्ये ही सेम तेच होत असेल ना? ऍकच्युअल फ्लोरवर फ्रेशर्स आणि प्लानिंगला फक्त सीनीअर्स!”
माझा प्रॉब्लेम हा झालाय की मी फ्लोरवर काम करण्याइतकी ज्युनिअर नाही, आणि कंप्लीट प्लानिंग बघण्याइतकी सीनीअर नाही
बिंगो. म्हणूनच जॉबचं काम होत नाहीये. पण काहीतरी मिळेल. डोण्ट वरीमाझ्या केसांमधून हात फिरवत तो हलकेच म्हणाला.
जुन्या एजन्सीमध्ये हॅण्डोवर देऊन रिकामी झाले. तरीही नवीन नोकरीचे काहीच जमेना. अख्ख्या जगाचीच इकॉनॉमी कोसळली होती, त्यात आमच्यासारख्या छॊट्यामोठ्या लोकांचा काय निभाव लागणार. एशान एरवीपेक्षा हल्ली जास्त गंभीर असायचा, त्याच्या एजन्सीचा मुख्य फोकस सोशल मीडीया ऍडव्हर्टायझिंग होता. आणि बहुतेक क्लायंटनी स्वत:चे पैसे वाचवायला सर्वात आधी याच जाहिरातींवरचा पैसा कमी करायचा निर्णय घेतला होता. तसा पैशाचा लगेचच काही प्रॉब्लेम झाला नसता, पण तरीही एजन्सी धोक्यात होतीच.
एके दिवशी एशान खूप गप्पगप्प होता, अजिबात नेहमीसारखा बोलत नव्हता. मी दोन-तीनदा काय झालं म्हणून विचारलं. शेवटी रात्रीचं जेवण झाल्यावर किचन आवरत असताना तो अचानक म्हणाला, “आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटींग होती. एच आरने मला स्टाफ कमी करायला सांगितलंय. तीन नवीन इंटर्न पोरं आहेत आणि एक सीनीअर एक्झिक्युटीव्ह
मग?”
एक्झीक्युटीव्हचा परफ़ॉर्मन्स चांगला नाही, मागे दोन अप्रेझलमध्ये वॉर्निंग दिली होती, म्हणून काढायचं आहे.  त्याचं मला एवढं काही वाटत नाही, पण ती इंटर्न पोरं मात्र...  सर सर करत माझेच लाड करतात. त्यांना काढून टाकायचं जीवावर आलंय. एच आरचा शर्मा काही केल्या ऐकत नाहीये. कसले कसले आकडे नाचवत राहतो..”
पण बॉस तू आहेस ना? थोडं नुकसान झालं तरी चालेल, पण तुझ्या मनाविरूद्ध काही वागू नकोस. त्या मुलांना दुसरीकडं जॉब बघतायेत असेल तर बघ
सगळे प्लान्स वर्क आऊट करून पाहिलेत. नथिंग इज हॅपनिंग.” एशानचा एरवी हसणारा चेहरा आता खूप गंभीर होता. “स्वत:हून नोकरी सोडून गेले तर मी या मुलांना मोठी पार्टी दिली असती, पण आता मीच जा म्हणून सांगणं कसंतरी वाटतंय. बिचारी. एवढीशी तोंडं होतील त्यांची. आता बाहेर कुठं जॉब मिळ्णार नाही हे त्यांनापण चांगलंच माहित आहे शिवाय पोरं चांगली मेहनती आहेत. ब्राईट आहेत. जा म्हणून् सांगणं माझ्याच्यानं होणार नाही. तुला काय वाटतं?” त्यानं मलाच विचारलं.
तुला जर त्यांना कामावरून काढायचं नसेल तर काढू नकोस. दुसर्‍या प्रोजेक्टमध्ये घेता येतील का बघ...थोडे दिवस कसंतरी करून.”
तसंच काहीतरी करेन. आणि तूपण जास्त काळजी करू नकोस. तुझ्यापण जॉबचं काम होऊन जाईल!”
लवकर झालं तर बरं आहे, मला आता कंटाळा आलाय.” पण याक्षणी मला माझ्या नोकरीपेक्षा हाताखालच्या तीन मुलांना काढायचंकसंया विवंचनेमध्ये असलेल्या एशानची जास्त काळजी होती. त्याला असं काही करणं बिल्कुल आवडलं नसतं.शिवाय त्यानं  मनाला खूप लावून घेतलं असतं. एशानचा स्वभाव वरवर कितीही बेफिकीर आणि निष्काळजी वाटत असला तरी त्यानं एखाद्यावर जीव लावलाच तर तो कसा लावतो ते माझ्याशिवाय कुणाला माहित असेल? काहीतरी मार्ग निघायलाच हवा होता.
मला घरी बसून जवळजवळ दीड महिना झाला होता. एक विचित्र रूटीन सेट झालं होतं. सकाळी उशीरा उठायचं. निवांत ब्रेकफास्ट करायचा, मग टीव्ही बघत नाहीतर पुस्तक वाचत लोळायचं. दुपारी जेवलं की असंच विनाकारण मॉलमध्ये पाय मोकळं करायला म्हणून जायचं आणि खिसा मोकळा करून यायचं. लग्नानंतर इतक्या वर्षात  केली नसेल तितकी खरेदी मी या दिवसांत गेली. संध्याकाळी एशानसोबत गप्पा, रात्री जेवायचं आणि टीव्ही बघत झोपी जायचं. एशान घरामध्ये असला नसला तरी या दिनक्रमामध्ये फारसा फरक पडायचा नाही. हल्ली तो घरून काम करण्यापक्षा ऑफिसमध्येच जास्त वेळ असायचा..
एकीकडे प्रचंड कंटाळा येत होता, तर दुसरीकडं काहीच न करण्याचा आरामात दिवस घालवायचा फील पण मस्त येत होता. पण हे फार दिवस टिकण्यासारखं नव्हतं. नोकरी हवीच होती. खाली दिमाग शैतान का घर झाल्यासारखं झालं होतं.
एके दिवशी एशान आणि मी असंच टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघत बसलो होतो, तेव्हा मध्येच माझा मोबाईल वाजला. कसल्याशा रीक्रूटमेंट कन्सल्टन्सीमधून फोन होता. ऐकून मी एकदम सातवे आसमानमध्येच. सुमारे अर्धा तास फोनवर त्या पलिकडच्या मुलीनं माझी सगळी चौकशी केली, माहिती कन्फ़र्म केली आणि लगेचच दुसर्‍या दिवशीचा इंटरव्यु पण सेट केला. इंटरव्ह्युसाठी ऑफिसचा पत्ता लगेचच मेसेज करून कळवते म्हणाली.
फोन संपल्यावर मी ही बातमी आनंदानं एशानला ऐकवली. “ऐक ना, ती म्हणत होती की सेटप छोटासा आहे. आणि फिल्डपण टोटली वेगळं. क्लायंट सर्व्हिसिंग. तेसुद्धा ईव्हेंटसाठी नाही.”
त्यांचा फोकस काय आहे?” तो टीव्हीवरून नजरदेखील न हटवत म्हणाला.
ऍडव्हर्टायझिंग!” मी लगेच विचारलं. “मला जमेल? खरंतर माझ्यासाठी कंप्लीट फिल्ड चेंज होइल. पण हरकत नाही ना? अगदीच रिकामं बसण्यापेक्षा ते परवडलं
हो ना, तू चोवीस तास घरात बसून माझं डोकं फिरतं त्यापेक्षा बाहेर गेलेली परवडशील.”
चिडवू नकोस. नोकरी सोडल्यानंतर हा माझा पहिला इंटरव्ह्यु आहे. ऍट लीस्ट तेवढं तरी.” मी समोरचा रिमोट उचलून वैतागून टीव्ही बंद केला.
यु विल गेट इट. डोन्ट वरी. मी आहे ना?” एशान हलकेच माझ्याजवळ येत म्हणाला. “उद्या मी सांगतो तो ड्रेस घालून जा. मागच्या महिन्यांत घेतला होतास ना.. ब्लॅक कलरचा
तो जरा जास्तच शॉर्ट नाहीये?”
वेल, शॉर्ट इज स्वीट...” तो हसत म्हणाला. “तसंही काळा रंग तुझ्यावर खूप छान दिसतो. कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी घातला होतास तेव्हाच मला हार्ट एटॅक आलेला.. आठवतंय?” तो अजूनच जवळ येत म्हणाला.
शान, मला उद्याची पूर्ण तयारी करायची आहे!” पण एशान ऐकणार आहे? उद्याची तयारी उद्याच करावी लागणार.
रीक्रूटमेंटवाल्या मुलीनं इंटरव्ह्युसाठी लोकेशन पत्ता पाठवला होता. अंधेरीमधलं कुठलंसं हॉटेल होतं. मी परत तिला फोन करून वॉक इन वगैरे भानगड नाही ना ते विचारून घेतलं. तिनं हसत तसं काही नाही, पण तिच्या क्लायंटचं ऑफिस रीनोव्हेशनमध्ये असल्यानं लंचच्या दरम्यानं इंटरव्ह्यु घ्यायचं ठरल्याचं सांगितलं.
दुसर्‍य़ा दिवशी केजीला जाणार्‍य़ा उत्सुक मुलीसारखी तयार झाले. माझी सतत फाईल नीट लावताना बघून, इंटरव्ह्युसाठी टिप्स वगैरेसाठी आयत्यावेळी गोंधळून नेटवर सर्च करताना बघून एशान खुदखुदत हसत बसला होता. दोन-तीनदा मी त्याच्यावर भडकलेच, मग तोही वैतागून शेवटी अकरा वाजता काहीतरी काम होतं म्हणून ऑफिसमध्ये गेला, म्हणून मी निवांत सर्व आवरून वेळेमध्ये सांगितलेल्या पत्त्यावर पोचले. एशानने सुचवलेला काळा ड्रेस घालण्याऐवजी मी सरळ फॉर्मल शर्ट ट्राऊझर्स घातले.
काय घडलं असावं? एनी गेसेस? त्या हॉटेलमध्ये ईएम ऍडवहर्टाअय्झिंगचा सीईओ माझी वाट बघत बसला होता. त्याला पाहताक्षणी मी कपाळावर हात मारून घेतला.
हाय, नाईस टू मीट युअत्यंत औपचारिकपणे हात पुढं करत तो म्हणाला. “तुझ्यासारख्या सेक्सी आयटमची आमच्या ऑफिसला फार गरज आहे. खूप दिवसांपासून ऑफिसमध्ये एक तरी अफेअर करायची माझी जाम इच्छा होती.तू आलीस तर नक्की! आय स्वेअर
मला फार हसू यायला लागलं. “सीरीयसली? मी तुझ्यावर सेक्शुअल हरासमेम्टची केस करू शकेन.”
ओह.. नॉट पॉसिबल, तू या कंपनीमध्ये आधीपासून स्लीपिंग पार्टनर आहेसच. शिवाय लीगली माझी बायको पणवेटर येऊन मेनूकार्ड समोर ठेवून गेला. “विसरलीस?”
शान, हा प्रकार तरी काय आहे?” मी त्याला विचारलं. “तुला माहित आहे ना... एक तर मला जॉब ऑफर येत नाहीत. या एका फोननं मी किती वेडी झाले किती खुश झाले. तू माझी कालपासून मजा बघतोयस का?” मी नाराजीनं विचारलं.
अरे, चेष्टा काय आहे? आय ऍम सीरीयस. मी तुला हा जॉब ऑफर तर करू शकत नाही. कारण, तू ऑलरेडी फर्ममध्ये पार्टनर आहेस. पण मी तुला रीक्वेस्ट करतो, वूड यु लाईक टू वर्क विथ मी?”
कशासाठी? इतक्या वर्षांत तुला माझी मदत लागली नाही. शिवाय तुझं आणि माझं फिल्ड वेगळं आहे.”
एशाननं त्याच्या हातातली फाईल माझ्यासमोर ठेवली. “म्हणूनच मी विचार करतोय, की आता ईव्हेंट मॅनेजमेंट क्लायंट्स घेणं चालू करावं. दोन क्लायंट्स ऑलरेडी तयार आहेत. तुझ्यासारखी बायको असताना मला आजवर ते का सुचलं नाही ते माहित नाही. पण तुझा अनुभव आणि माझी हुशारी (इथे मी त्याच्या हातावर फटका मारलाच!) आपण नवीन फिल्ड ट्राय करू शकतो. सोशल मीडीया ऍडव्हर्टायझिंगला सध्यातरी लिमिटेड एक्स्पोझर आहे. ट्रॅडीशनल ऍडव्हर्टायझिंगमध्ये खूप स्पर्धा आहे. पण ईव्हेंट मॅनेजमेंटमध्ये प्रचंड स्कोप आहे.  तिथं कायम काम मिळत राहणार आहे.”
एशान, तसं नक्कीच नाहिये, तुला हालत माहित आहे..”
मी गेल्या महिन्याभरामध्ये या इंडस्ट्रीचा बराच अभ्यास केलाय.. त्यातून मला इतकं नक्की समजलंय की स्कोप प्रचंड आहे. फक्त कॉस्टिंग कमी  ठेवायला हवंय. तुझी आधीची एजन्सी या अति कॉस्टिंगपायी नुकसानीत गेली.. ते जर आपण करू शकलो आणि व्हेंडर्सकडून कमीतकमी पैशामध्ये डील मिळवत गेलो तर दिस कॅन वर्क. आणि आपल्याला फार मोठे एव्हेंट्स घ्यायचेच नाहीत. छॊटे कार्पोरेट लेव्हलचे ईव्हेट्स पुरेसे आहेत.. व्हेंडर्सशी तुझा कॉन्टॅक्ट आहेतच ते पुढं डेव्हलप करत येईल. मी तुला मागे म्हणालो होतो बघ. मला तीन इण्टर्न्स कमी करायचे होते... ती तिन्ही मुलं तुझ्या हाताखाली देईन. मेहनती पोरं आहेत. शिवाय बाकीचं माझा सेटप आहेच.”
शान, माझ्याकडे स्वतंत्रपणे काम करण्याइतका अनुभव नाहीये
असं का म्हणतेस?तू याआधी स्वतंत्रपणे तर क्लायंट हॅंडल करत होतीस. तेव्हा बॉसला फक्त रीपोर्टींग तर करायचीस. आता तेही नाही. मग हे आरामात जमेल. बीलीव्ह मी
इम्पॉसिबल. अजिबात शक्य नाहीमी लगेच उत्तर दिलं.
थॅंक गॉड, तू नाही म्हणालीस!”तो एकदम खुशीत म्हणाला.
म्हणजे?”
तुझी सवयच आहे ना, आधी नाही म्हणायचं, मग जरा मी मस्केबाजी केली, इमोशनल ड्रामा केला की हो म्हणायचं... मॅडम. आज ओळ्खत नाही तुम्हाला. एक अख्खी पंचवार्षिक योजना काढली आहे तुमच्यासोबत
शान, दिस इज रीअली अ बिग स्टेप. मला तेवढा स्वत:वर विश्वास नाही
माझ्यावर आहे?” मी काहीच उत्तर दिलं नाही. “बोल ना! माझ्यावर विश्वास आहे? हे मी माझ्यासाठी करत नाहिये. मी माझ्या कामात खुश आहे. पण हे तुझ्यासाठी... तुझ्या करीअरसाठी आहे. दुसर्‍याची नोकरी करण्यापेक्षा तू स्वत: काम करणं जास्त चांगलं असं तुला वाटत नाही का? तुला हवं तसं काम हव्या त्या पद्धतीनं तुला करायचं आहे. मी मदत करायला कायम आजूबाजूला असेनच.”
मला भिती वाटेल.”
कसली?”
फेल व्हायची.क्लायंट्स मिळालेच नाहीत तर?? काही गडबड झालीतर?”
ठिक आहे ना.गडबड झाली तर दोघं मिळून निस्तरू.क्लायंट्स नाही मिळाले तर आपलं काम बंद पडेल. थोडीफार आर्थिक झळ पडेल. आपण रस्त्यावर तर येणार नाही. इतकं नक्की! मग कशाला घाबरतेस?”
मी काही उत्तर दिलं नाही. वेटर् आल्यावर एशाननेच काहीतरी ऑर्डर दिली. मी त्यानं समोर ठेवलेली फाईल उघडून वाचली. खरंच त्यानं इंडस्ट्री सर्व्हे वगैरे चांगला व्यवस्थित केला होता. छोट्या एकदोन दिवसांच्या ईव्हेंटच्या बर्‍यापैकी क्लायंट्स पण नक्की मिळाले असते. पण तरीही.... मी फाईल बंद केली.
तुला जितका विचार करायचाय तो कर. मी काय आता लगेच काम चालू करूया म्हणत नाही तो शांतपणे म्हणाला.
शान, दिस इज इव्हेंट मॅनेजमेंट. हार्ड कोअर काम असतं. दिवसाचे चोवीस तास कमी पडतील इतकं काम.शिवाय सगळं काम दुसर्‍यावर अवलंबून. त्यात बरंचसं टीमवर्क. आपण एकत्र काम करणार. घरामध्ये आपण काहीच नसताना न भांडता दिवसभर राहू शकत नाही. तेच ऑफिसमध्येही होईल. प्रोफेशनल गोष्टी घरामध्ये आणि घरातल्या गोष्टी ऑफिसमध्ये. एशान, एक क्षण...फक्त एक क्षण या सगळ्यांचा आपल्या नात्यावर काय प्रभाव पडेल याचा तू विचार केलास का?”
मी ताडताड बोलत असताना एशानचा चेहरा अतिगंभीर झाला. नक्कीच त्यानं हा मुद्दा विचारात घेतलेला नसणार. मी पण तेवढ्यावरच सोडून दिलं. शेवटी माझ्या जॉब इंटरव्ह्युची परिणती नवर्‍याच्याच सोबत झालेल्या लंच डेटमध्ये झाली. इथून पुढं एशान ऑफिसला निघून गेला आणि मी निरूद्देश इकडेतिकडे भटकत राहिले. दोन तीन दिवस असेच गेले. मला नोकरीचा काही कॉल येईना, स्वत:वरच राग यायला लागला. एशाननं नंतर स्वतंत्र इव्हेंट मॅनेजमेंट बिझनेसचा परत विषय काढला नाही. अर्थात त्याच्या डोक्यामधून इतक्या सहजपणे हा विचार गेलाच नसता हे मलाही माहित होतं. कारण त्यानं अचानक मला एका क्लायंट मीटींगला सोबत येशील का असं विचारलं. करण्यासारखं दुसरं काहीही काम नसल्यानं मी पण म्हटलं चला!
क्लायंट म्हणजे अगदी छोटीशी सॉफ्टवेर कंपनी होती. बोरीवलीला कुठंतरी ऑफिस.  त्यांना काही दोन-तीन नवीन प्रॉडक्ट्स आणायचे होते त्यासाठी प्रेस कॉन्फ़रन्स करायची होती. प्रेस कॉन्फरन्सचा एकंदर खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर जाणारा होता, म्हणून त्यांना ही पूर्ण कॅंपेन सोशल मीडीयावर शिफ्ट करायची होती. बोलता बोलता मी सहज त्यांना प्रेस कॉन्फरन्सचे फाईव्ह स्टारहॉटेल व्हेन्यु सारखे नेहमीचे सरधोपट मार्ग सोडून अजून काय काय करता येईल ते सुचवत गेले. त्यामध्ये टेक्नॉलॉजीवर लिहिणार्‍या ब्लॉगर्स मीट आणि टेक्निकल रीलेटेड मॅगझिनसाठी एखादा कार्पोरेट ईव्हेंट हे दोन्ही पर्याय त्यांना फार आवडले. एशाननं लगेचच हे ईव्हेंट्स तो प्लान करून देईल हे कबूलपण केलं. पण ईव्हेंट्स एक्झीक्युट करायला मात्र त्याला जमलं नस्तं. त्यासाठी वेगळा इव्हेंट मॅनेजर शोधावा लागणार होता. हे सांगताना तो माझ्याकडे बघत होता. सोशल मीडीया कॅंपेन हातातून जाऊन त्याचं नुकसान झालं असतं, ते किमान या इव्हेंट्समधून भरूनकाढता यावं म्हणून मी हे ईव्हेंट्स फ्रीलान्सर म्हणून घ्यायचे तिथेच कबूल केलं. छोटंसंच तर काम होतं. जास्तीत जास्त तीन ते चार दिवसांचं काम.
यु आर गूड!” मीटींग आटोपल्यावर कारमधे बसताना एशान मला सहज म्हणाला.
आता समजलं का?” मी त्याला उलट चिडवलं.
आधीपासून माहित आहे. म्हणून तर तुला रीक्वेस्ट करतोय. स्वत:चं काम तूच चालू कर. नोकरीपेक्षा जास्त चांगलं काम करशील. क्रीएटीव्ह स्पार्क आहेच, तो नीट डेव्हलप कर.”मी काही उत्तर न देता खिडकीमधून बाहेर बघत राहिले. तोच पुढं म्हणाला. “राहता राहिला, तुझ्या माझ्या नात्यावर होणारा परिणाम. ती गोष्ट अशी आहे की, ज्याचं आपण कधीच प्रेडिक्शन करू शकत नाही. कारण, मुळात आपलं नातंच इतकं कमकुवत आहे की..”
मी आश्चर्यानं वळून त्याच्याकडे पाहिलं. “कमकुवत?”
हो! तुला असं कधीच वाटत नाही? आणि मुळात ना नातं कधीही कमकुवतच असावं. म्हणजे ते जीवापाड जपलं जातं. जेव्हा रिलेशनशिप्स अकारण फार स्ट्रॉंग होतात तेव्हा आपण समोरच्याला गृहित धरायला लागतो. हे गृहित धरणं कधीही कूठल्याही नात्याला डुबवतं. कायमचं.” एशान ड्राईव्ह करताना मला लेक्चर द्यायला लागला होता.
मला हा फंडा अजिबात समजला नाही सिग्नल हिरवा झालेला असल्यानं एशान काही न बोलता ट्राफिकमधून गाडी काढत राहिला. “साला, दुपारी दोन वाजता पण ट्राफिक जाम. काये?”
पुढचा लाल सिग्नल आल्यावर त्यानं वळून माझ्याकडं पाहिलं. “सिंपल आहे. आज तुला अशी भिती वाट्ते की जर आपण एकत्र काम करायला लागलो तर आपल्यामध्ये अजून भांडणं होतील आणि आपल्या नात्यावर त्याचा विपरीत परिणाम होइल. तुला असं कधीच वाटलं नाही की ही भिती... आजवर आपलं नातं तरून नेतेय. कारण, कुठंतरी तुला तुझं चूक आहे, किंवा माझी चूक आहे हे या  भितीमध्ये मान्य आहे. नातं तुटण्यासाठी एक हलकासा धक्का पुरेसा आहेदिवसाचे चोवीस तास एकत्र असलो काय, आणि दोनच तास एकत्र असलो काय. त्यासाठी तुम्ही किती वेळ एकत्र आहात आणि काय करता त्याला जास्त महत्त्व नाही. एकमेकांवरचा विश्वास आणि त्याहून जास्त एक व्यक्ती म्हणून समोरच्याचा आदर या गोष्टी ज्याक्षणी हादरतात तेव्हा ते नातं तुटतं. आणि मला तुझ्याबद्दल त्याहूनही जास्त स्वत:बद्दल इतकं नक्की माहित आहे की आपण ते होऊ देणार नाही. चुकून कधी झालंच तर माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की मी ते कसंही निभवून नेईन. कुठलंही वादळ आलं तरी मला चालेल. माझा माझ्यावर... माझ्या प्रेमावर तितका विश्वास आहे. आपण एकत्र काम केलंतर डेफिनेटली भांडणं होतील. होणारच. पण ती भांडणं दोन कलीग्जची. नवरा बायकोची की दोन मित्रांची हे आपल्या हातात आहे ना....”
शान, हे  बोलणं फार सोपं आहे. पण प्रत्यक्षामध्ये....”
प्रत्यक्षात काय.... खूप भांडू, तू चिडून बाहेर पडशील, मी तुला सॉरी म्हणत येईन किंवा मी खूप चिडेन, तुझ्याशी अजिबत बोलणार नाही. मग तू मला सॉरी म्हणशील... हेच घडेल ना? आजवर तेच तर होत आलंय.. पण या कुठ्ल्याही भांडणांनी तुझ्या आणि माझ्या नात्याचा पाया हादरला आहे का? बोल ना.” सिग्नलला लावलेली गाडी पुढं काढत तो म्हणाला.
म्हणजे तुझ्या मते, जोपर्यंत आपण एकमेकांना सॉरी म्हणतोय तोपर्यंत प्रॉब्लेम होताच कामा नये.”
नाही. जोपर्यंत प्रॉब्लेम होतात तेव्हाच आपण एकमेकांना सॉरी म्हटलं पाहिजे. सॉरी नुसतं म्हणून उपयोग नसतो. तो तर एक फॉर्मलिटीचा शब्द आहे. सॉरीमध्येही केवल मला माफ कर इतकंच अभिप्रेत असून उपयोगाच्ण नाही. सॉरी म्हणताना केवळ माफी मागून उपयोग नसतो तर मी तुला दुखवलंय, हर्ट केलंय. तुझ्या भावनांचा मी योग्य आदर राखला नाही याची मला जाणीव असावी लागते.. आणि ती जाणीव केवळ मला उमजून उपयोगाचं नसतं तर ती समोरच्याला ज्याला मी दुखवलंय त्याच्यापर्यंत पोच्णं हे फार गरजेचं आहे तर त्या माफी मागण्याला काहीतरी अर्थ आहे.. माफी मागण्यांत काहीच मोठेपणा नसतो. चूक कबूल करण्यात पण काहीच मोठेपणा नसतो. माझ्या चुकीमुळे कळत नकळत कुठंतरी मी तुला किंवा तू मला त्रास दिलास, हर्ट केलंस हे जाणून घेणं हे फार मोठेपणाचं काम आहे. आणि आपल्याला ते जमेल. अत्यंत खाजगी वैयक्तिक अशा नवरा बायकोच्या या नात्यामध्ये जिथं समोरच्याला गृहित धरणं इतकं सर्रास आणि राजरोस असू शकतं तरीही आपण ते जमवलंय. बघ ना? कितीवेळा काहीही करायच्या आधी किंवा बोलायच्या आधी तू माझा विचार करतेस, मी तुझा विचार करतो? करतो ना? म्हणून तर आज आपलं नातं टिकलंय.  मग प्रोफेशनल लाईफमध्येही आपण ते झेपवून नेऊ. तसंही त्या दिवशीचं तुझं बोलणं ऐकल्यावर मी खूप विचार केलाय मला वाटतंय की ईव्हेंट मॅनेजमेंट विल बी  अ कंप्लीटली सेपरेट थिंग. आपण एकत्र काम करणार नाही. पूर्णपणे स्वतंत्र रीत्या काम करू
म्हणजे?”
ईएम ऍडव्हर्टायझिंग आणि तुझी ईव्हेंट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी या दोन सेपरेट एंटीटीज असतील. जशी तू माझ्या कंपनीमध्ये पार्टनर आहेस, तसा मी तुझ्या कंपनीमध्ये असेन पण ते नावापुरतं. सगळं निर्णयस्वातंत्र्य तुझ्याकडे.सुरूवातीच्या बजेट अलोकेशन व्यतिरीक्त त्यात माझा काहीच सहभाग नसेल. सावकाश तुझा सेटप पूर्ण्पणे वेगळा करत येऊ. इन फॅक्ट थोड्या दिवसांनी ऑफिसेस पण वेगळीच करूया. म्हणजे तुला जी भिती वाटतेय ती वाटणर नाही, अर्थात कितीही वेगळं म्हटलं तरी तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी कायमच एकत्र असू. कसल्याही कुठल्याही कठिण सोप्या आनंदाच्या दु:खाच्या प्रसंगासाठी.”
तू सगळंच ठरवून मोकळा झालायस का?”
पुढचा लाल सिग्नल अपेक्षेप्रमाणे लागलेलाच होता. “मी काहीही फायनल ठरवलेलं नाही. जो काही विचार केलाय तो सांगतोय. त्यावर तुला काय वाटतं ते सांग. नंतर आपण व्यवस्थित चर्चा करून काय ते ठरवूच.”
एकच क्षण मला माझ्या नशीबाचा हेवा वाटून गेला. बायकोच्या करीअरचा इतका विचार करणारा, तिला केवळ मदत किंवा प्रोत्साहन न देता स्वत:हून तिला पुढं जाण्यासाठी काहीतरी करणारा हा नवरा नक्की कुठल्या जन्माच्या पुण्यईनं मिळाला असणार? पण तरी मनातले शंकासुर काही गप्प बसले नव्हते.
त्यनं हलकेच माझ्या हातावर हात ठेवला.“मला तुझी भिती समजतेय. आय कॅन अंडरस्टॅण्ड इट. मी जेव्हा माझी एजन्सी चालू केली तेव्हा सहा महिन्याची इंटर्नशिप सोडल्यास दुसरा कसलाही अनुभव माझ्याकडे नव्हता. सगळे चक्क हसले होते, पण डॅडनी तेव्हा सपोर्ट केला. म्हणाले, तुझं दिवाळं निघालं तर मी मदत करेन. पण ती वेळ येऊ नये म्हणून तरी तुला हे निभवून न्यावंच लागेल आणि मी ते निभवलंय. आज इकॉनॉमी इतकी बोंबलूनसुद्धा मला जास्त झळ पोचलेली आही. कारण, मी माझ्या चुकांमधून शिकत गेलो. तुझ्याकडे तर सहा वर्षांचा अनुभव आहे. तू हे कसंही तारून नेशील.”
एशान, ते सगळं मान्य आहे. पण मला याचा आपल्या नात्यावर बिल्कुल परिणाम होऊ द्यायचा नाही म्हणूनच..”
होणार नाही. जगातली कुठलीही क्षुल्लक गोष्ट तुझ्या-माझ्या नात्यावर काहीही परिणाम करू शकणार नाही. आय प्रॉमिस. तुझा माझ्यावर... माझ्या शब्दांवर विश्वास आहे ना? मी आजवर दिलेला प्रत्येक शब्द पाळलाय. हादेखील पाळेन.” गाडी परत लाल सिग्नलला थांबली होती. एशाननं पुढं झुकून माझ्या कपाळांवर ओठ टेकवले. “तू आयुष्यात खूप पुढं जाशील याची मला खात्री आहे. तेवढा तुझ्यावर विश्वास आहे. तोच विश्वास तू तुझ्यावर ठेव. किमान माझ्यासाठी!” त्याच्या हिरव्यानिळ्य डोळ्यांमध्ये बघतानाच मी हरवून गेले होते. त्याची नजर कायम असलीच जीवघेणी आहे. त्याला जे काही हवं ते मिळवणारी. “आपल्या लग्नाच्या वेळी सुद्धा तुला हीच भिती होती ना? इट विल नॉट वर्क आऊट. बट लूक ऍट अस. आणि तेव्हाही मला ही खात्री  होती, की आपण एकत्र राहू शकू. आपण आज नवरा बायको म्हणून पाच वर्षं झाली किती खुश आहोत. वाटेत काही स्पीडब्रेकर आले.. पण त्यामुळे फक्त स्पीड कमी झालाय, गाडी थांबली नाही. थांबणारही नाही. लेट्स ट्राय दिस!” माझा हात हातात घेऊन तो म्हणाला.
हो म्हणण्याखेरीज दुसरं मी काय करू शकणार होते?

No comments:

Post a Comment