आपल्या आयुष्याचे अनेक भाग असतात, पण
सगळेच भाग एकसारख्या लांबीचे नसतात. वेगवेगळ्या आकाराचे, लांबीचे, रूंदीचे आणि
आठवणींचे हे गुंते असतात. एक धागा या आयुष्यात कधी सरळ नसतो. ज्या रात्री आफताब
माझ्या फ़्लॅटबाहेर पडला. त्यानंतर दुसर्या दिवसापर्यंत घालवलेल्या प्रत्येक
मिनिटाचं, सेकंदाचं वर्णन मी करू शकते. तो अख्खा चौदा तासाचा काळ मी माझ्याच
मनामध्ये कित्येक वेळा जगली आहे.. ही तर नुकतीच घडलेली घटना. पण केदारबरोबर माझं
लफडं... अफेअर, प्रेमप्रकरण, रिलेशनशिप, भानगड.. जी काय तुमची सांस्कृतिक व्याख्या
आहे त्यानुसार नाव द्या... तब्बल दोन वर्षं चाललेली ही गोष्ट. ही दोन वर्षं मात्र
माझ्या मेंदूमध्ये अगदी तीन चार सेकंदामध्ये झरझर निघून जातात. पण मन घुटमळतं ते
आफताबसोबत काढलेल्या प्रत्येक क्षणाभोवती.
कॉलेज डेजच्या पहिल्या दिवशी आमची ओळख
झाली. दुसर्या दिवशीच्या मिसमॅच डेला त्यानं मला एक भलंमोठं झेंडूचं फूल दिलं.
“आजच्या दिवसाला झेंडूच शोभेल.” या कार्डासकट.
त्यानंतर मी त्याच्या ग्रूपला भेटले. तो
माझ्या मैत्रीणींना. ट्रॅडिशनल डेला मी काकीने मद्रासवरून आणलेली हाफ साडी नेसले
होते. खरंतर त्याचं आणि माझं यावर काही बोलणं झालंच नव्हतं पण त्त्यादिवशी तो
नेमका मद्रासी लुंगी नेसून आला होता. पूर्वीनं मला यावरून चिडवून चिडवून हैराण
केलं. निधी बॉंम्बेमधला कहनाही क्या मधला सोनेरी ड्रेस घालून आली होती. तिचं
माझ्याकडे लक्षच नव्हतं ते एका अर्थानं बरं आहे. केदारनं त्या दिवशी सगळ्या
ग्रूपनं लंचला जायचा प्लान केला. अर्थात त्याचा ग्रूप आणि आमचा ग्रूप. गौतमी त्या
दिवशी साधीशीच साडी नेसली होती. तिला म्हटलं चल आमच्यासोबत. ती तयार नव्हती तरी
तिला जवळजवळ ओढून कारमध्ये घेतलं. पूर्वी (डीडीएल्जेमधला काजोलचा तो हिरवा
लुंगीसारखा ड्रेस. ओल्ड फ़ॅशन्ड पण छान), मी, निधी, रझिया (ही नऊवारी साडीमध्ये
असली गोड दिसत होती.) केदारच्या ग्रूपमध्ये चारपाच जण होते. मला आता त्या सर्वांची
नावे आठवत नाहीत.
दुसर्या दिवशी चॉकलेट डे आणि रेड कलर डे एकाच
दिवशी होता. चॉकलेट डेचा मला काहीच उपयोग नव्हता. मी लाल रंगाचा वन पीस घातला
होता. मी कॉलेजमध्ये आले तेव्हा केदार
नव्हता, वर्गात लेक्चरला गेले तर माझ्या बेंचवर एक गुलाबांचा बूके ठेवला होता. नाव
पत्ता काहीच लिहिलेलं नव्हतं, पण कुणी ठेवलाय हे मलाच काय पण अख्ख्या वर्गाला
समजणार.
अखेर, केदारने मला साडी डे च्या दिवशी
विचारलं. त्यादिवशी दोन वर्षांपूर्वी आज्जीने दिलेली पैठणी नेसले होते (तीच
पीरीयड्सच्या साडीचोळी फंक्शनची) आज्जीनेच गिफ़्ट दिलेला नेकलेस आणि आईचे इतर
दागिने. छान तर दिसत असणारच. अगदी बाबा पण म्हणाला, “निल्या, जास्त भटकू नकोस रे.
घरी लवकर ये. दृष्ट लागेल तुला” पण त्या दिवशी मी कॉलेजला गेलेच नाही. कॉलेजच्या
आधीच वळणावर केदार माझी वाट पहात होता.
त्यादिवशी आम्ही पहिल्यांदा दोघंच फिरायला
समुद्रावर गेलो. सकाळी दहाचं कॉलेज. त्यावेळेला बीचवर कुणी असेल असा प्रश्न
तुम्हाला पडला असेल तर...
कॉलेजमधले बहुतेक प्रेमी कपल्स आज
समुद्रावर आले होते. त्यात आम्ही दोघंही. केदार तेव्हा मला “जबरदस्त, भन्नाट”
वगैरे वाटायचा. त्याच्या प्रत्येक वाक्यावर मला हसू यायचं. त्याचे वार्यावर उडणारे
सिल्की केस पहातच बसावेसे वाटायचे. आज इतक्या वर्षांनी वाटतं, जे काही होतं ते
केवळ आकर्षण तर होतं. त्या वयामध्ये असं आकर्षण वाटणं काही फार गहजब वाटण्यासारखं
नसतं. पण आपल्या आजूबाजूला ना समाज नावाचा एक व्हिलन कायम असतो. या समाजाला नक्की
काय हवं अस्तं माहित नाही, पण दुसर्यांच्या भानगडीमध्ये नाक खुपसायचं असतं. दुसर्यांना
टोमणे मारायचे असतात आणि असलंच बरंच काही.
मी आणि केदार “कपल” आहोत आणि बरेच सीरीयस
आहोत ही गोष्ट अख्ख्या कॉलेजभर व्हायला जराही वेळ लागला नाही. निधीसारखं मला माझं
लफडं लपवून ठेवावं असंदेखील कधी वाटलं नाही. आय ऍम शुअर, घरीपण कु्णीतरी आई अथवा
बाबाला यातलं काहीतरी सांगितलं असेल. पण आईबाबा मला एका शब्दानं काही बोलले नाहीत.
कसल्यातरी नोट्स द्यायला, एकदा कंप्युटरचा माऊस बदलायला केदार माझ्या घरीपण येऊन
गेला. आई काही बोलली नाही. एक तर केदारची आणि माझी जात सेम होती. शिवाय तो
चांगल्या घरामधला मुलगा होता. पैसेवाला होता. सेम गोष्ट माझीपण. त्यामुळे त्याच्या
किंवा माझ्या घरात कुणालाही विरोध करायला काहीच कारण नव्हतं. हा मुद्दा सध्या
कितीही फेवरमध्ये वाटत असला तरी याच मुद्द्याने नंतर माझ्या गळ्याला फास लावला.
कसं ते सांगेनच, पण त्या आधी दोन अपडेट्स.
माझं कॉलेजचं पहिलं वर्षं संपलं आणि चाची
गेल्या. कायमच्याच. त्या खूप आजारी होत्या. वय झालं होतंच. ऍंजिओप्लास्टी आणि
बायपास होऊनही तब्बेत कधी नीट झालीच नाही. पुण्यामधल्याच हॉस्पिटलमध्ये त्या
गेल्या. आम्हाला बातमी समजली तेव्हा त्यांचं सर्व काही होऊन गेलं होतं. आफताब फक्त
एका दिवसासाठी गावी आला होता. त्याच्याशी बोलणं झालं तेही जुजबीच. अझरभाई दोन
महिन्यांनी आला. तोही फारसा बोलला नाही. मी पण माझ्याच विश्वांत मग्न होते. आई मला
सांगत होती की, आफताबच्या काकांचं म्हणणं होतं की अझरभाईनं हे घर आता विकून
टाकावं. पण आफताबचे मामा म्हणत होते की घर विकू नका, भाड्यानं द्या.
अझरभाईला काय करावं तेच सुचत नव्हतं. या
गावाशी वास्तविक पाहता त्याचा काही संबंध नाही, हे चाचींचं माहेर. चाची त्याची
सावत्र आई. सावत्रपणाची नाती टिकणार कशावर, आता चाचीच नाहीत. घराचं काय करायचं तेच
अजून ठरत नसताना एके दिवशी आफताबनं मला फोन केला.
“काल अझरभाईंची सगाई झाली.” “अरे वा,
कधी?” गेले आठ दिवस अझरभाई गावातच होता. घरात क्वचित असायचा, पण लग्न ठरल्याचं
वगैरे काहीच बोलला नव्हता.
“कालच. आपल्याच गावातली मुलगी आहे.
रिश्त्यामधलीच. माझ्या एका दूरच्या मामांची मुलगी” आफताब पेपरमधली बातमी वाचून
सांगावी इतक्या रूक्षपणे सांगत होता. मी पण इकडून केवळ ह्म्म म्हटलं. “पुढच्या
महिन्यांत शादी. गावाकडेच असेल. तेव्हा मी येईन” इतकंच बोलून त्यानं फोन बंद केला.
त्यादिवशी संध्याकाळी केदारला भेटायला
गेले तेव्हा ही बातमी सांगितली.
“ते तुमच्या बाजूला राहतात ते मुस्लिम
फॅमिली? ते जर घर विकणार असतील तर मी घेईन”
“आता कशाला घर विकतील? अझरभाई राहील. त्याचं
लग्न झालं की. शिवाय तुझं घर आहे की इतकं मोठं! मग हा बंगला कशाला घेशील?”
“असंच. आपल्यासाठी” तो हसत म्हणाला.
“मग माझं घर आहेच की. वेगळं कशाला घ्यायला
हवंय?”
अझरभाईंचं लग्न झालं तेव्हा आई आणि मी
गेलो होतो. त्या लग्नाबद्दल जितकं कमी बोलावं तितकं चांगलं. कुठलंतरी कोपर्यातल्या
खेड्यातली मुलगी होती. घरातच निकाह केला पण जागा पुरेशी नव्हती. गर्दी, उकाडा, आणि
एकूणातच अव्यवस्था. लग्न केवळ निभवायचं म्हणून केलं होतं. त्यात कुठेही प्रेमळपणा
नव्हता. आपुलकी नव्हती. एखाद्या अनाथ मुलाचं लग्न लावून द्यावं तसंच हे सर्व चालू
होतं. मुलीकडचेदेखील फार उत्साही दिसत नव्हते. मी आयुष्यातलं पहिलंच मुस्लिम लग्न
पाहत असल्यानं काहीकाही गोष्टींची जाम मज्जा वाटली. इतक्या गर्दीत आफताब मला
एकदोनदा दिसला. शेरवानीमध्ये ओळखू न येण्याइतका ताडमाड उंच दिसत होता. “निधी नाही
आली?” एकदा मी हळूच चिडवलं.
त्यानं माझ्याकडे एकटक रोखून क्षणभर
पाहिलं. “आमचा ब्रेक अप झाला” चुकीच्याच वेळी बोलले असं क्षणभर वाटलं. पण मी
आफताबला पूर्ण ओळखून होते. यानं परत कुठेतरी भानगड केली असणारच याची मला खात्री
होती.
सेहरा बांधलेला जादू खरंच देखणा दिसत
होता. त्याची बायको नूरी पण दिसायला खूप सुंदर होती. नाजुक आणि अगदी त्याला शोभेल
अशी. या दोघांचा संसार अगदी सुखाचा आणि आनंदाच होइल अशीपण मला खात्री होती.
माझीच मला वाटणारी ही खात्री किती पोकळ
होती हे माझं मलाच थोड्य़ा दिवसांनी समजलं.
केदार म्हणतो तेच खरं, मला माणसं वाचताच
येत नाहीत.
>>>>>
अझरभाईंचं लग्न झालं आणि आमचं शेजारचं घर
आठवड्याभरासाठी का होइना पण परत एकदा गजबजून गेलं. लग्नासाठी आलेली पाहुणे,
भेटायला येणारे कोण कोण असं अख्खा शेजार नांदता राहिला. आफताबपण थोडे दिवस होता.
“अभ्यास कसा चालू आहे?” माझ्या खोलीत
आल्यावर त्यानं पहिलाच प्रश्न विचारला.
“ठिक, लिसन, मी निधीशी हल्ली रोज बोलत
नाही, त्यामुळे ती काहीच बोलली नाही” मी लग्नाच्या मांडवामध्ये झालेला प्रकार
सावरून घेण्यासाठी म्हटलं.
“ते ठिक आहे, वी आर बॅक टूगेदर”
“काय?” हे म्हणजे हॉलीवूड स्टार कपल्सच्या
वरताण झालं.
“फोनवरून चिक्कार भांडलो होतो तेव्हा
तुटलं होतं पण आता गावी आल्यावर भेटल्यावर परत दिलजमाई झाली. सो नो टेन्शन” निधी
आफताब लव्हस्टोरीचा ग्राफ काढला तर तो नक्की इंटरेस्टिंग येणार. एक तर अतिशय वरचं
टोक नाहीतर एकदम खालचा बार. अधलीमधली काय स्टेज नाहीच.
“ऐकून बरं वाटलं.”
“मलाही बरंच वाटलं. केदारबद्दल ऐकून”
ही गोष्ट आफताबपर्यंत पोचणारच नाही वगैरे
माझे भ्रम कधीच नव्हते. इन फॅक्ट त्याला आधी कळलेलं असतानाही त्यानं मला चिडवलं
कसं नाही हाच प्रश्न पडला होता. मी काहीच बोलत नाही हे बघून तोच पुढे म्हणाला.
“आता अझरभाईनंतर तुमचाच नंबर लागणारे”
“चल. मूर्खपणा करू नकोस”
“चल. मूर्खपणा करू नकोस”
“उगाच लाजायची ऍक्टींग करू नकोस. तुला जमत
नाही. बट एनीवेज कॉंग्रॅट्स, केदार चांगला मुलगा आहे”
“तुला काय माहित?”
“हा! हा! हा!” तो विनाकारण फिल्मी हसत
म्हणाला. “जानी, हम सब जानते है. इतकंच काय पण मागच्या महिन्यात मैत्रीणीच्या
गावाला म्हणून...” मी उगाच डोळे मोठे केले. त्यानं आवाज कमी केला. “गोव्याला गेला
होतात ना? तीन चार दिवस. समुद्र, बीच, बीअर आणि....”
“शटाप” मी आफताबला फटका मारला.
ही गोष्ट त्याला कशी कळली याचं मात्र मला
अतोनात आश्चर्य वाटलं. कारण मी निधीलादेखील हे सांगितलं नव्हतं. जनरलच बोलले होते.
मुळात ही आयडीया केदारचीच होती. आमचं अफेअर सुरू होऊन वर्ष झालं होतं. तरी आमची
मजल काही किसिंगच्या पुढे गेली नव्हती. जाणार कशी? उघड्यावर काही करायला माझा ठाम
नकार होता. कुठं हॉटेल लॉजवर जायचं तर अख्ख्या गावामध्ये कोणतरी मला अथवा केदारला
ओळखणार. त्याच्या अथवा माझ्या घरी जायचं तरी वांदेच. शेवटी तीन चार दिवस गोव्याला
जायचं ठरवलं. फिरणं, भटकंती, एंजॉय वगैरे सर्व काही अपेक्षित होतंच. पण मुख्य उद्देश
मात्र सेक्स होता.
इथवर आमचं खटलं येईपर्यंत मी केदारशीच
लग्न करणार हे मला चांगलंच माहित होतं. केदार सारखा जोडीदार मला हवा होता. तो
मनमोकळा होता, प्रचंड बोलायचा, माझी त्याला खूप काळजी होती. मी घरामधली एकुलती एक
होते. त्याचं अखंड एकत्र कुटुंब होतं. केदारच्या वडलांचे तीन भाऊ आणि त्यांची
फॅमिली असे सगळे पंधरासोळाजण मिळून एकाच घरात रहायचे. घर कसलं...अपार्टमेंट
कॉंप्लेक्स होतं. प्रत्येक मजल्यावर दोन फ़्लॅट असं बांधल्यासारखं. पण मुख्य किचन
एकच. तरी केदार म्हणायचा की मी त्याच्या घरात व्यवस्थित ऍडजस्ट होइन, त्यासाठी तो
हेल्प करेल. घरचे मला सांभाळून घेतील. मुख्य म्हणजे तो माझी साथ कधीच सोडणार नाही.
गोव्याचा प्लानपण त्यानंच ठरवला. त्याची
कार घेऊन आम्ही गेलो होतो. त्यानं घरी काय सांगितलं ते माहित नाही. माझ्या घरी मी
गौतमीच्या गावाला दोन चार दिवस सुट्टीसाठी जातेय असं सांगितलं. गौतमीला कल्पना
देऊन ठेवली होती हे एक नशीबच.
गोव्याला जाताना मी काय केदार काय
दोघांनाही फार थ्रिलिंग वाटत होतं. आयुष्यातला पहिला अनुभव. माझाही आणि त्याचाही. गोव्यामध्ये
कार घातल्यापासूनच हवा बदलल्यासारखी वाटायला लागली. गोव्याच्या हवेतच खरंतर नशा
आहे. केदारनं समुद्राकाठचं एकदम भारी रीझॉर्ट बूक केलं होतं. रूम छानच होती.
सर्व्हीसपण एकदम नीट. हॉटेलमध्ये जे रेस्टॉरंट होतं तिथलं जेवण अप्रतिम होतं. एवढं
सर्व छान छान का सांगतेय माहित आहे का? कारण, आमचा मेन प्रोग्राम सुरूवातीलाच टोटल
फेल गेला होता.
माझं ज्ञान इतपतच होतं की मला काहीही
करायचं नाहीये. जी काय जबाबदारी आहे ती केवळ केदारचीच. इकडं येण्याआधी मी निधीसोबत
एकदा बोलले होते. (निधी-आफताब लव्हस्टोरी या स्टेशनवरून केव्हाच भुर्रकन गेली
होती) तिनं पण मला तेच सांगितलं होतं. “नंतर सवय झाली की तू इनिशीएटीव्ह घेऊ
शकशील” असा महत्त्वाचा सल्ला पण तिनं दिला.
केदारनं कुणासोबत काय सल्लामसलत केली होती
माहित नाही. पण त्याला काही जमेना. म्हणजे इतर सर्व जमतच होतं. किसिंग वगैरे
आधीपासून आम्ही करत होतो, त्यामुळे एकमेकांच्या शरीराचा अजिबात परिचय नव्हता असंही
नाही. तरीही पहिल्यांदाच एकदम कपड्यांशिवाय पाहताना अवघडलोच. त्याच्याहीपेक्षा मी
जास्त. निधीच्याच सल्ल्यानुसार मी शेविंग वगैरे केलं होतं. केदार तर खूपच
एक्सायटेड होता. पण..
इतर सर्व काही करूनही त्याला आत काही जाता
येईना. मला तर खूप दुखत होतं. थोडंफार ब्लीडींगही झालं होतं. ते रक्त पाहून
माझ्याहीपेक्षा जास्त केदार गडबडला. त्याला हे नवीनच. मला काय महिन्याला इथून
धबधबे वहायची सवय. पण रक्ताहीपेक्षा जास्त त्रास दुखण्याचा होत होता. केदार
प्रयत्न करत होता, पण तरीही जमेचना. शेवटी मी बास म्हनून सांगितलं.
“अजून झालंय कुठे?” तो म्हणाला.
“जितकं झालंय तितकंच बास. मला सहन होत
नाही”
“असं म्हणून कसं चालेल, एकदा लास्ट ट्राय
करतो. प्लीज” तो माझ्या डोळ्यांवर किस करत म्हणाला.
पण तरी लास्ट ट्रायला काही जमलंच नाही.
शेवटी आम्ही दोघांनीही नाद सोडून दिला. केदारने रूम सर्विस मधेच बीअर आणि काही
स्नॅक्स मागवले, मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाले. कपडे घातले.
केदार खूपच नर्व्हस होता. एकूणातच आपण या डीपार्टमेंटमध्ये फेल गेलोय हे
त्याला झेपत नव्हतं. प्रश्न क्षमतेचा नव्हता, टेक्निकचा होता आणि हे मला समजलेलं
असून मी त्याला सांगू शकले नसते. दिवसभर रूममध्येच होतो, म्हणून संध्याकाळी बीचवर
पाण्यात खेळायला गेलो.
परत आलो तेव्हा रात्र झालेली होती. बाहेरच
हक्का नूडल्स खाल्ले होते म्हणून भूक जास्त नव्हती. सकाळपासून ड्रायव्हिंग,
दुपारचे श्रम आणि पाण्यात खेळून केदारपण खूप दमला होता. तरी म्हणाला. आपण परत एकदा
प्रयत्न करू.
मी नको म्हटलं असतं तर तो खूप दुखावला
असता. खरंतर माझी बिल्कुल इच्छा नव्हतीच. साला, या सेक्सचा नुसता गवगवा करून
ठेवतात. प्रत्यक्षात ही कृतीच अत्यंत घाणेरडी आणि ओंगळ आहे या मतावर मी हळूहळू ठाम
होत होते. पण तरी केवळ केदारच्या मनासाठी मी कपडे उतरवले. आता केदार दुपारपेक्षा
जास्त वेळ माझ्याबरोबर खेळला, मलाही जरा बरं वाटलं. मी अधिकच झपाट्यानं त्याच्या
कुशीत शिरले, त्याचवेळी तोही माझ्यामध्ये शिरला.
मरायला ही हायमेनची कन्सेप्ट कशाला असते
बाईच्या शरीरात? उपयोग काय आहे असल्या गोष्टींचा? जिथे केदारला अमाप सुख का काय ते
मिळत होतं तिथं माझी बोंबलण्यासारखी परिस्थिती झाली होती. खूप जोरात बाथरूमला
आल्यासारखं वाटत होतं. पण जाणार कसं? अंगावर तर केदार त्याच्याच विश्वात मग्न
होता. इतके दिवस हातात धरून खेळायच्या खेळाला हक्काचं घर मिळालं होतं. लवकरच
केदारचं सुखही संपून माझ्या ओटीत सांडलं.
दमून थकून तो माझ्याच अंगावर कोसळला. आपण
जगात कायतरी भारी अचिव्ह केलंय आणि आपल्यापेक्षा भारी पुरूष या भूतलावर होणेच
नाही, अशा अविर्भावात त्यानं मला तो भरलेला कंडोम उचलून दाखवला. यक्क! माझं
तुझ्यावर कितीही प्रेम असेल तरीही मी असलं काही माझ्या हातात घेणार नाही. तोंडात
वगैरेतर फारच दूरची बातच.
एकूणातच हा सेक्सचा पहिला अनुभव फार काही
एनकरेजिंग नव्ह्ताच. पण आयुष्य हे केवळ सेक्सच्या अनुभवांवर बनत नाही. केदारनं
नंतर मलाजवळ घेऊन माझे खूप लाड केले. त्रास झाला का म्हणून विचारलं. जनावरासारखा
अंगावर चढून झोंबणार्या केदारचा मला राग आला होता, पण त्यानंतर मला त्रास होइल म्हणून अतिशय काळजी घेणार्या केदारवर तितकंच
प्रेमही आलं होतं. त्यानं जबरदस्ती केली नाही हाही त्यातल्याच त्यात प्लस पॉइंट
ऍंड निधी वॉज
राईट. इट गेट्स बेटर ऍंड बेटर. अगदी सुरूवातीला यामधेय मला एंजॉय करण्यासारखं असेल
असं मला कधी वाटलंच नाही. समाधानासाठी माझ्याकडे माझी हातचलाखीची पद्धत होतीच. पण
तरीही नंतर तीनचार वेळेनंतर मी आणि केदार एकदमच आलो. माय फर्स्ट ऑरगॅझम थ्रू
सेक्स. अमेझिंग!
नंतर गावी परत
येताना जाणवलं की आता माझ्या आणि केदारच्या नात्याचे डायनॅमिक्स पूर्ण बदललेत. इतके
दिवस आम्ही केवळ एकमेकांना ओळखत होतो. आता हे नातं त्याही पलिकडे गेलेलं आहे.
कारमध्ये केदार
मला काहीतरी स्किनबद्दल सांगत होता. त्यामुळेच त्याला पहिल्यांदा त्याला इतका
त्रास झाला वगैरे काहीतरी. त्याला काय म्हणायचंय ते मला समजलं नव्हतं त्यामुळे मी केवळ
ऐकल्यासारखं दाखवत होते.
त्याला काय
म्हणायचं होतं ते मला खूप नंतर लक्षात आलं. आफताबबरोबर सेक्स केल्यानंतर.
(क्रमश:)
No comments:
Post a Comment